सोमनाथ ज्योतिर्लिंग ( गुजरात — वेरावळ )
सोमनाथ ज्योतिर्लिंग हे पृथ्वीतलावर असलेलं पहिलं ज्योतिर्लिंग आहे अस मानलं जात. हे मंदिर गुजरात राज्यात सौराष्ट्र क्षेत्रात वेरावळ जवळ प्रभास पठण येथे आहे. शिवपुराण नुसार, जेव्हा चंद्राला दक्ष प्रजापतीने क्षय रोग होईल असा श्राप दिला होता, तेव्हा या ठिकाणी तप करून या श्रापापासून मुक्ती मिळवली होती.
असेही मानले जाते की या शिवलिंगाची स्थापना स्वतः चंद्रदेवाने केली होती. विदेशी लोकांच्या आक्रमणात ह्या मंदिरवर जवळ जवळ १७ वेळा हल्ला करून नासधूस करण्यात आल. पण तरीही प्रत्येकवेळी नव्याने हे मंदिर उभारण्यात आले.
सध्याच्या मंदिराची उभारणी सरदार वल्लभ पटेल यांच्याकडून करण्यात आली आहे. आणि त्याचे उद्घाटन डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सोमनाथ मंत्र =
सौराष्ट्र देशे विशवेतिरम्ये , ज्योतिर्मय चंद्रकलावंतसम
भक्तिप्रदानाय कृतावतारम तं सोमनाथं शरणं प्रपधे ||
विविध ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
१२ ज्योतिर्लिंग - द्वादश ज्योतिर्लिंग | मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग | महाकालेश्र्वर ज्योतिर्लिंग | ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग | वैधनाथ ज्योतिर्लिंग | भीमाशंकर ज्योतिर्लिंग | रामेश्वर ज्योतिर्लिंग | विश्वेश्वर ज्योतिर्लिंग | त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग | केदारनाथ ज्योतिर्लिंग | नागेश्वर ज्योतिर्लिंग | घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
Comments
Post a Comment