मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ( आंध्रप्रदेश - श्रीशैल्य )
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंग आंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या तीरावर नल्लमलाई डोंगर रांगात श्रीशैल पर्वतावर आहे. या मंदिराला भगवान शिवच्या कैलास पर्वतासारखेच मानले जाते. या भागातील जंगल हे सदाहरित प्रकारचे आहे. जवळच श्रीशैलम जलविद्युत केंद्र आहे.
असे मानलं जात की, या ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने सर्व पाप धुतले जातात. येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात भगवान शिवचे वाहक नंदी तपस्या करत होते. त्यावेळी महादेव तपस्या पाहून प्रसन्न झाले आणि मल्लिकार्जुन रुपात तर माता पार्वती ब्रह्मनंदा रुपात इथे प्रगट झाले.
श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलय्या वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा प्रोलय्याने पाताळगंगा ( कृष्णा नदी ) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला. नंतर विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पध्रव्या शतकात राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर आणि सलुमंतापस व इतर भागाचे निर्माण केले. इ. स. १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुरचे बांधकाम केले.
मल्लिकार्जुन मंत्र -
श्री शैलशृंगे विविधप्रसंगें , शेषाद्री श्रुंगे sपि सदा वसंततम |
तमर्जुनं मल्लिकार्जुनं पूर्वमेकम, नमामि संसारसमुद्रसेतूम ||
श्री शैलशृंगे विविधप्रसंगें , शेषाद्री श्रुंगे sपि सदा वसंततम |
तमर्जुनं मल्लिकार्जुनं पूर्वमेकम, नमामि संसारसमुद्रसेतूम ||
विविध ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
१२ ज्योतिर्लिंग - द्वादश ज्योतिर्लिंग |सोमनाथ ज्योतिर्लिंग | महाकालेश्र्वर ज्योतिर्लिंग | ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग | वैधनाथ ज्योतिर्लिंग | भीमाशंकर ज्योतिर्लिंग | रामेश्वर ज्योतिर्लिंग | विश्वेश्वर ज्योतिर्लिंग | त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग | केदारनाथ ज्योतिर्लिंग | नागेश्वर ज्योतिर्लिंग | घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
Comments
Post a Comment